शिंदे, शिवसेना पुन्हा आमनेसामने! मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमावरुन अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड

| Updated on: Sep 17, 2022 | 7:47 AM

Ambadas Danve on Eknath Shinde : सकाळी जरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं असलं, तरी शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम घेतला जाईल, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात असतो.

शिंदे, शिवसेना पुन्हा आमनेसामने! मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमावरुन अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड
दानवेंची शिंदेंवर टीका
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद : शिंदे गट आणि शिवसेना (Shine vs Shiv sena) पुन्हा आमनेसामने आले आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Mukti Sangram Day) दिनावरुही आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ambadas Danve on Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. औरंगाबादमध्ये सकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमावरुन अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला मुख्ममंत्र्यांनी कमी वेळ दिला, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.

दरवर्षी सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम घेतला जातो. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी नऊ वाजण्याऐवजी सकाळी सात वाजताच कार्यक्रम घेतला, असं दानवे यांनी म्हटलंय. 15 मिनिटांत हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आल्यामुळे सरकार आणि शिवसेनेमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतोय. म्हणूनच शिवसेना आता पुन्हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दणक्यात कार्यक्रम करेल, असंही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ : अंबादास दानवे काय म्हणाले?

हे सुद्धा वाचा

सकाळी जरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं असलं, तरी शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम घेतला जाईल, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात असतो. दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमापेक्षा यंदा मुख्यमंत्री शिंदे यांनी थोडक्यात हा कार्यक्रम आटोपता घेतला, असा आरोप करत शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय.

का थोडक्यात आटोपला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबादला रवाना होणार आहेत. हैदराबादमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक, या तीन राज्यांचा मिळून  मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता यावं, यासाठी औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम लवकर घेण्यात आला होता. दरम्यान, यावरुन शिवसेनेनं मात्र शिंदे यांच्यावर टीका केलीय.