बच्चू कडू यांचा गॉडफादर नेमका कोण?; ‘त्या’ वक्तव्यावर अंबादास दानवे यांचा आक्षेप

| Updated on: Jul 13, 2023 | 5:01 PM

Ambadas Danve on Cabinet Expansion : एकनाथ शिंदे यांचं बंड अन् 'त्या' वक्तव्यावर अंबादास दानवे यांचा आक्षेप. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचा खोचक टोला, म्हणाले...

बच्चू कडू यांचा गॉडफादर नेमका कोण?; त्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांचा आक्षेप
Follow us on

मुंबई 13 जुलै 2023 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. खातेवाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार अर्थ खातं मिळावं यासाठी आग्रही आहेत. तर अर्थखातं अजित पवार गटाला दिलं जाऊ नये, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. या सगळ्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू यांचा नेमका गॉडफादर कोण आहे? तेच आम्हाला कळत नाही. आधी म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला म्हणून मी राज्यमंत्री झालो. त्यानंतर म्हणतात फडणवीस यांनी फोन केला म्हणून मी गुवाहाटीला गेलो. आता म्हणतात 18 तारखेला मला मुख्यमंत्र्यांनी बोलावलंय. नेमकं त्यांच्या मनात आणि डोक्यात काय सुरू आहे, तेच करायला मार्ग नाही. त्यांनी त्यांचा गॉडफादर कोण आहे ते ठरवावं मग बोलावं, असं अंबादास दानवे म्हणालेत.

मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. त्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. त्याला आता अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे.

सध्या युती सरकारमध्ये प्रचंड अस्थिर परिस्थिती आहे. हा जो कॅबिनेटचा विस्तार आहे. त्याबद्दल आम्ही आधीच सांगितलं होतं की, आता हा विस्तार होणार नाहीये. यापुढे देखील पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वीही हा विस्तार होणार नाही. पावसाळी अधिवेशनाच्या नंतरही तो होणार नाही हा आमचा शब्द आहे. केवळ आणि केवळ आपल्या आमदारांना मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्या प्रमाणे भाजपला जर विधानसभेच्या 150 जागा लढवायच्या असतील. तर राष्ट्रवादी 90 जागा लढवेल. उर्वरित ज्या 48 जागा आहेत. त्या जागा शिंदे गट लढवेल, असं बावनकुळे यांच्या बोलण्यावरून वाटतंय. पण जर ते 200 जागा लढले तर मात्र विधानसभेच्या 350 जागा कराव्या लागतील. तेव्हा जाऊन ते 150 चा आकडा पार करू शकतील, असं अंबादास दानवे म्हणालेत.

अब्दुल सत्तार यांच्या अडचणी भविष्यामध्ये वाढ होणार आहेत. सरकार त्यांच्या बाबतीत काय करेल, असा आम्हाला वाटत नाही. पण जनता आणि न्यायालय त्यांना योग्य तो धडा शिकवेल. अब्दुल सत्तार यांना ब्लॅकमेलिंग करण्याखेरिज दुसरं काही येत नाही, असं म्हणत अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे.