औरंगाबाद : ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे… एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याता महाराष्ट्राचा महासंकल्प’, अशी जाहिरात आजच्या सामनाच्या पहिल्या पानावर छापून आली आहे. त्यावरून मनसेने (Raj Thackeray) उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. खोके सामनाच्या ऑफिसपर्यंत पोहोचले का? असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टीका केलीय. त्याला आता ठाकरेगटाच्या वतीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मनसेच्या आंदोलनांचा दाखला देत त्यांना प्रश्न विचारण्यात आलाय.
मनसेनं टोलविरोधात आंदोलन केलं. राज ठाकरे भोंग्यांवर बोलले. पण आता ते अगदी शांत आहेत. याचा ‘राज’ काय? मनसेकडेही खोके पोहोचले का? असं म्हणत ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसेवर टीका केलीय.
सामनातील जाहीराती हा वेगळा मुद्दा आहे. कारण सामना हे महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाहीराती येणं स्वाभाविक आहे. आलेली जाहीरात त्यांनी छापली यात गैर काय? असं अंबादास दानवे म्हणालेत.
मनसेलाच खोक्यांची सवय आहे, असं दानवे म्हणालेत.
आदित्य ठाकरे यांचा दौरा कुठल्याही गर्दीसाठी नाही तर लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आहे. अतिवृष्टीची मदत लोकांना पोहोचली आहे का? याचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे दौरा करत आहेत, अशी माहितीही दानवे यांनी दिलीय.