औरंगाबाद : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या टायमिंगवर टीका केली जात आहे.त्यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलंय.
उध्दव ठाकरे यांचा हा दौरा जनतेसाठी आहे. त्यांच्या दौऱ्यावर विरोधक करत आहेत. पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो की, तुम्ही शेतकऱ्यांना मदत जाहिर करा. आम्ही दौरा करणार नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, असं अंबादास दानवे म्हणालेत.
उद्धव ठाकरेंचा होत असलेला हा दौरा कुठलाही राजकीय दौरा नसून जनतेसाठीचा दौरा आहे. राज्य सरकारने दिवाळी शिधा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. पण हा शिधा अद्यापही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे, असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
निश्चितपणे उद्धव ठाकरे यांनी दौरा केला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या शिवसेनेकडून मदत पण द्यायला हवी. परंतू जर केवळ राजकारण करण्यासाठी येत असतील तर याला जनता माफ करणार नाही.आगामी जिल्हा परिषद महापालिकेत शेतकरी यांना उत्तर देतील, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे.