…म्हणून शिंदे गट, भाजप, मनसे महापालिकेसाठी एकत्र येतील; अंबादास दानवेंचा खोचक टोला

| Updated on: Oct 22, 2022 | 1:46 PM

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

...म्हणून शिंदे गट, भाजप, मनसे महापालिकेसाठी एकत्र येतील; अंबादास दानवेंचा खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद :  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Davve) यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शुक्रवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर आगामी मुंबई महापालिकेसाठी हे तीन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात महायुतीचा प्रयोग होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली. याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना तिनही नेत्यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे?

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांची दहशत आहे, त्यामुळे हे महापालिका निवडणुकीत एकत्र येतील असं दानवे यांनी म्हटलं आहे.

‘त्यांना मोठं का म्हणायंच’?

तसेच या तिंघाना लोक मोठे नेते का म्हणतात हेच मला कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक जण चाळीस आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला मोठेपण याला गद्दारी म्हणतात असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. दरम्यान एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांना मोठं म्हणायचं का असा सवाल दानवे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

ओला दुष्काळा जाहीर करण्याची मागणी

दरम्यान दुसरीकडे राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.