मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता युती पक्की झाली आहे. त्यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या सगळ्यानंतर सर्वांच्या भुवया तेव्हा उंचावल्या, जेव्हा अमित शाह, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून मातोश्रीच्या बाहेर पडले.
अमित शाह आणि उद्धव ठाकरे हे वरळीतील एका हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करणार आहेत. त्यापूर्वी मातोश्रीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं मंथन झालं. पण मातोश्रीच्या बाहेर पडतानाचं जे चित्र होतं ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि भाजपवर यापूर्वी अत्यंत टोकाची टीका केली आहे. शिवाय शिवसेना का पटक देंगे असंही अमित शाह काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. पण या आरोप-प्रत्यारोपानंतर शिवसेना आणि भाजपचं पुन्हा एकदा जुळलं आहे. जवळपास 50 मिनिटांच्या बैठकीनंतर अमित शाह आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.
व्हिडीओ पाहा :