मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत जात आहेत. शासकीय अधिकारी काम करत आहे. याचा जनतेला लाभ होत आहे. राज्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या पोटात गोळा उठला आहे. माणसे आणावी लागतात असे विरोधी पक्षाचे नेते म्हणतात. पण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेला कुणाला आणावं लागत नाही माणसे स्वतः हुन येतात. सर्व पक्षाचे कार्यकर्ते येतात. जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम उबाठा गट करत आहे अशी टीका शिवसेना (शिंदे गट) नेत्याने केली आहे.
राज्यात एकीकडे 205 आणि विरोधी पक्षाचे किती असे चित्र आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून सगळे आकर्षित होत आहेत. ‘कमिशन, खोके’ हे मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे. आता त्यांना ते मिळणे बंद झालं आहे. निवडणूकीच्या दृष्टीने जे सर्व्ह सुरू आहेत त्यात उबाठा गटाच्या एका नेत्याने 13 पैकी 3 आमदार निवडून येतील असे सांगितले आहे. त्यामुळे या भीतीने सरकारची बदनामी करण्याचरे उद्योग सुरु आहेत पदाधिकारी नाही, लोक प्रतिनिधी नाही, कार्यकर्ते नाहीत म्हणून ही टीका सुरु आहे असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला.
गद्दार, ओरिजनल, डुप्लिकेट असतात असे हे म्हणतात. कोण आहेत ज्यांनी 2019 मध्ये हिंदुत्वाशी गद्दारी केली. त्यावेळी किती पैसे मुख्यमंत्री होण्यासाठी घेतले हे त्यांनी सांगावे. त्यांच्याबरोबर जे होते ते चांगले. शिंदे,अजित दादा सोबत होते तेव्हा चांगले. विरोधात गेले की गद्दार? एकनाथ शिंदे या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. कुठेही अनिश्चिततेच वातावरण नाही. कुठलीही कामे राहणार नाही असे पावसकर म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितलं 2024 च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार अस वारंवार सांगितलं आहे. वजनदार खात हे महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाचं आहे. भोंग्याने सांगावे कोणतं महत्त्वच आहे. भाजपमध्ये 105 आमदार आहेत त्यांची मते जाणून घेणार की नाही. सरकार किंवा पक्ष घरातून चालवतात त्यांना हे विचार पटणारे नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुख्यमंत्री पदाबाबत सकाळचा भोंगा खोट्या बातम्या पसरवत आहे. अमित शहा त्यांना जोड्यासमोरही उभे करत नाही. त्यांची जी काही केविलवानी धडपड सुरु आहे ती राज्यसभेची शेवटची टर्म वाचविण्यासाठी आहे. दिवा विजताना जशी फडफड करतो तशी त्यांची फडफड सुरु आहे. शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. त्याला रस्त्यावर आणि सभागृहात उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला.