अमित शाह 1 सप्टेंबरला सोलापुरात, दिग्गज नेत्यांची मेगा भरती होणार?

| Updated on: Aug 27, 2019 | 10:39 PM

यात्राप्रमुख आणि भाजपचे सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप 1 सप्टेंबर रोजी सोलापुरात अमित शाहांच्या (Amit Shah Solapur) उपस्थितीत होईल.

अमित शाह 1 सप्टेंबरला सोलापुरात, दिग्गज नेत्यांची मेगा भरती होणार?
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी बुधवारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, तर 1 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याच्या समारोपासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah Solapur) उपस्थित राहणार आहेत. यात्राप्रमुख आणि भाजपचे सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप 1 सप्टेंबर रोजी सोलापुरात अमित शाहांच्या (Amit Shah Solapur) उपस्थितीत होईल.

भाजपमध्ये सध्या इनकमिंग जोरात सुरु आहे. अमित शाहांच्या उपस्थितीतही राष्ट्रवादीचे काही बडे नेते भाजपात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सोलापूरच्या कार्यक्रमासाठी वेळ मागितल्याची माहिती होती. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

राज्यात जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात भाजपने महाजनादेश यात्रा काढली. या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु असून याचा समारोप 1 सप्टेंबरला होणार आहे.

भाजपात येण्यासाठी वेटिंगवर असलेले नेते

माजी खासदार धनंजय महाडिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते (Dhananjay Mahadik) 31 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मोदी 31 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक हे आधी शिवसेनेत होते, मग त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून ते खासदार झाले. मात्र यंदाच्या पराभवानंतर ते आता भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केला तर तो त्यांचा तिसरा पक्ष असेल.

पाटील पिता-पुत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला (NCP Shivswarajya Yatra ) पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील (Dr Padmasinh Patil) आणि त्यांचे आमदार पुत्र राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राणा पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. डॉ पाटील परिवारातील पिता-पुत्र बरोबरच सून जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील आणि नातू मल्हार पाटील यापैकी एकही जण या शिवस्वराज्य यात्रेला हजर नव्हता.

यापूर्वी राष्ट्रवादी सोडलेले दिग्गज नेते

  • माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश
  • माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबाचा भाजप प्रवेश
  • शिवेंद्रराजे भोसले यांचा भाजप प्रवेश
  • मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड भाजपात
  • संदीप नाईक नगरसेवकांसह भाजपात
  • बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार