मुंबई : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात या मंत्र्यांमध्ये खातेवाटप झालं. यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी हे पद राजनाथ सिंह यांच्याकडे होतं. नव्या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्र्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आधीच्या सरकारमधील संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे वित्तमंत्र्यालयाची जबाबदारी आली आहे. तर एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्र्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच सरकारच्या सर्वात महत्त्वपूर्ण रक्षा समिती सीसीएसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह हे चार मंत्रीही प्रमुख राहतील.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पद आल्याने आता ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तीशाली मंत्री असतील. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान देशाची धुरा ही अमित शाहांच्या हातात राहील. अमित शाह यांच्या एका छोट्याश्या शेअर ब्रोकर ते आज देशाच्या गृहमंत्री पदापर्यंतचा प्रवास अतिशय रंजक राहिलेला आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अमित शाह त्यांच्यासोबत काम करत आहेत. मोदी-शाहची जोडी म्हणजे जय-वीरुची जोडी म्हणून ओळखली जाते.
अमित शाहांच्या या अनोख्या प्रवासातील काही महत्त्वाच्या गोष्टी
अमित शाह यांच्याविषयी थोडं
अमित शाह यांचा जन्म 22 ओक्टोबर 1964 मध्ये गुजरातच्या एका संपन्न वैष्णव परिवारात झाला. त्यांनी एक विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात पाऊल ठेवलं. 1986 मध्ये अहमदाबाद येथे अमित शाह आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली.