अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन, महापालिकेत काय घडलं?

| Updated on: Nov 28, 2019 | 3:21 PM

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेविरोधात थाळीनाद आंदोलन पुकारलं होतं.

अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन, महापालिकेत काय घडलं?
Follow us on

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात नव्या सरकारची नांदी होत आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेविरोधात थाळीनाद आंदोलन (Amit Thackeray Navi Mumbai Protest) पुकारलं होतं. या आंदोलनाला यश आल्याचं चित्र असून महापालिकेकडून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आलं आहे.

अमित ठाकरेंच्या नेतृत्वात कामगारांनी नवी मुंबई महापालिकेवर आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर, तीन आठवड्यात कामगारांचं 14 महिन्यांचं थकीत वेतन देण्याचं लेखी आश्वासन पालिकेकडून देण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीतील कंत्राटी कामगारांचं 14 महिन्यांचा फरक अदा करण्याच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

येत्या तीन आठवड्यात थकीत वेतन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबतही कंत्राटदाराला निर्देश देण्यात आले आहेत. सीवूड स्टेशन ते नवी मुंबई महापालिका या मार्गावर अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.

साडेसहा हजार कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा आम्ही काढत आहोत. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी (Amit Thackeray Navi Mumbai Protest) केलं होतं.

 

अमित ठाकरे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. ‘केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल वाराणसीच्या राजभर कुटुंबातील प्रिन्स राजभर या तीन महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळामार्फत अमित ठाकरे यांनी केईएमच्या अधिष्ठात्यांची भेट घेतली होती.

‘दादू’चं निमंत्रण ‘राजा’ने स्वीकारलं, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे येणार

याआधी, अमित ठाकरे ‘आरे वाचवा’ मोहिमेतही सहभागी झाले होते. आरे कॉलनीत जाऊन अमित ठाकरेंनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी अमित ठाकरेंचं लाँचिंग करण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे.