पंतप्रधानांनी आंदोलनजीवी सारखा शब्द वापरावा हे या देशाचे दुर्दैव : अमोल कोल्हे

| Updated on: Feb 10, 2021 | 3:43 PM

जय जवान जय किसान घोषणा होती. तिथे जवान विरुद्ध किसान परिस्थिती तयार करण्यात आली आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले. (Amol Kohe Farmer Protest)

पंतप्रधानांनी आंदोलनजीवी सारखा शब्द वापरावा हे या देशाचे दुर्दैव : अमोल कोल्हे
अमोल कोल्हे, खासदार
Follow us on

नवी दिल्ली: खासदार अमोल कोल्हे यांनी देशातील शेतकऱ्यांना या पद्धतीने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे, अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. त्या आंदोलनाची चेष्टा केली जाते दुर्दैवी आहे. आंदोलन बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. त्यांना खालिस्तानी देशद्रोही म्हटले जाते, हे अतिशय दुर्दैवी आहे. कृषी कायदे हा शेतकरी फायद्याचा हा विषय आहे असे सरकार सांगते. तरस, शेतकरी त्यांचा फायदा होत असताना आंदोलन का करतील हे सरकारने समजून घ्यायला हवं. सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चेष्टेचा विषय होऊ नये. पंतप्रधानांनी आंदोलनजीवी सारखा शब्द वापरावा हे या देशाचे दुर्दैव असल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली. (Amol Kolhe criticize Modi Government over farmer Protest)

जवान विरुद्ध किसान परिस्थिती तयार

शेतकरी आंदोलनावर चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा होता. ते समजून घ्यायला हवं, ठराविक मूठभर उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी हे सरकार वागतंय त्यामुळे हा असंतोषाचा भडका नक्की उडेल. जेव्हा परदेशात हाऊडी मोदी ऐकायला मिळतं तेव्हा आम्ही टाळ्या वाजवायच्या. ज्यावेळेस परदेशातील कोणी मानवतेच्या दृष्टीने ट्विट करतात त्याला आम्ही विरोध करायचा हे योग्य नाही. ज्या ठिकाणी जय जवान जय किसान घोषणा होती. तिथे जवान विरुद्ध किसान परिस्थिती तयार करण्यात आली आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

शेतकऱ्यांना भेटताना राजकीय हेतू नाही

उद्या आम्ही शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत. त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत हे सांगायला त्यांना भेटायला जाणार आहे. त्यामध्ये राजकीय हेतू कोणता नाही, अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली. शेतकरी आंदोलनात सर्व शेतकरी बांधव आहेत. त्यांचे मी आभार मानतो. अत्याचाराच्या विरोधात उभं राहण्याचा त्यांचा निर्धार खरोखर कौतुकास्पद आहे. ज्या पद्धतीने सरकार या आंदोलला चिरडण्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे. आम्ही बॉर्डर जाणार आहोत आणि जाताना जर सरकारने अडवलं तर सरकारची नियत खोटी आहे, असं मी समजतो. संसदेमध्ये आपण शेतकरी आंदोलनाला प्राथमिकता दिली आहे. पेट्रोलच्या दरांबाबत विषयी प्रत्येकाने चिंता व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणं ज्यावेळी लोकसभेत सुरू होतील त्या वेळेला हा विषय उचलला जाईल, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

मोदी रडले देशाने पहिलं. मात्र, पंतप्रधानांना देखील जसं एक हृदय आहे. त्याच काळजाने एकदा शेतकरी बांधवांची काळजी केली असती. तर, इतके दिवस कडाक्याच्या थंडीत शेतकरी बांधवांना आंदोलन करावं लागलं नसतं. शेतकऱ्यांविरोधात ज्या वेळी खिळे लावले जातात, अडथळे निर्माण केल्याचा त्यावेळेला देखील सेलिब्रिटींनी बोलायला हवं होतं. सेलिब्रिटींबाबत मी सध्या बोलणार नाही, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

 

संबंधित बातम्या :

आधी लोकसभेत मोदी सरकारवर आसूड, आता पवारांचा ‘खास मोहरा’ राकेश टिकैत यांची भेट घेणार

विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरल्याचं पाहून आनंद : देवेंद्र फडणवीस

(Amol Kolhe criticize Modi Government over farmer Protest)