Video | डोक्यात शेण भरलं त्यांच्या, अन् भोग आमच्या वाट्याला, अमोल कोल्हेंची संतप्त पोस्ट, पुतळे, चपलांचे हार, राज्यकर्त्यांवर वास्तवदर्शी कविता….

| Updated on: Dec 10, 2022 | 10:53 AM

राज्यकार्त्यांना भान नसलं तरी जनतेला जाण आहे, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी राजकीय नेत्यांना कवितेतून सुनावलं आहे.

Video | डोक्यात शेण भरलं त्यांच्या, अन् भोग आमच्या वाट्याला, अमोल कोल्हेंची संतप्त पोस्ट, पुतळे, चपलांचे हार, राज्यकर्त्यांवर वास्तवदर्शी कविता....
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान, राज्यकर्त्यांकडून एकानंतर एक होणारी अपमानास्पद वक्तव्ये आणि त्यांच्यावर नसलेला अंकुश यावर अत्यंत धारदार टीका करणारी कविता खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) महापुरुषांच्या अपमानाविरोधात कायद्यासंबंधी मागणी करताना अमोल कोल्हे यांचा माईक अचानक बंद करण्यात आला. संसदेत उपस्थित महाराष्ट्रातील (Maharashtra) खासदारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. राज्यकार्त्यांना भान नसलं तरी जनतेला जाण आहे, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी राजकीय नेत्यांना सुनावलं आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्विटर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यात ही कविता सादर केली आहे. ती कविता पुढीलप्रमाणे-

जागलेली माणसं, वाचलेली पुस्तकं

रुजलेले विचार सारे कुतूहलाने गोळा झाले

हे नवीन पुतळे, ते नवीन बॅनर

एवढ्या अचानक कुठून आले?

पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हारप्रत्येक

बॅनरला जोड्यांचा प्रसाद

रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं

काय झालं?

पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी

काम सुरु केलं?

प्रश्नासरशी

बॅनर्सने लाजेने अंग गुंडाळून घेतले

पुतळ्यांनी तर शरमेनं तोंड लपवलं

तरीही एका जागल्या माणसानं

त्यांची ओळख पटवली…

बॅनरवरील चेहरा पाहिला होता

भला मोठा हार घालताना

आवाजसुद्धा ऐकला होता

जोषपूर्ण भाषण ठोकताना

अरेच्चा… हे तर तेच महोदय…

हे तर ते, ते तर हे म्हणता म्हणता

सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली

निषेध उद्वेग संताप

सारं काही उमटलं होतं

प्रत्यक्षात जमत नाही म्हणूवन

बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं

कळवळून शेवटी एक पुतळा बोलला

जोडे खाऊन खाऊन आम्हालाच कंटाळा आला..

डोक्यात शेण भरलंय त्यांच्या

अन् भोग मात्र आमच्या वाट्याला..

महापुरुषांच्या नखाचीही सर नसताना

का जावं अकलेचे तारे तोडायला

समाधानाने पुस्तकं फडफडली

चला, आमच्या शब्दांमध्ये जान आहे

राज्यकर्त्यांचं भान सुटलं

तरी जनतेला अजून जाणा आहे….

इथे पहा व्हिडिओ—–