भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा कसे? लव्ह जिहादवरून अमोल मिटकरींचा सवाल

| Updated on: Dec 17, 2022 | 8:53 AM

जळगावातील मुक्ताईनगर येथे बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा कसे? लव्ह जिहादवरून अमोल मिटकरींचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगावः लव्ह जिहादला (Love Jihad) रोखण्यासाठी शिंदे-भाजप (Shinde BJP) सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरातील आंतरधर्मिय विवाहांची नोंदणी केली जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार टीका केली आहे. गल्लीतल्या आंतरधर्मियांचे विवाह तुम्हाला चालत नाहीत अन् दिल्लीतल्या लग्नांचं काय? असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांचंच उदाहरण दिलं. जळगावात मुक्ताईनगरमध्ये ग्राम पंचायत निवडणुकांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

अमोल मिटकरी म्हणाले, ‘ लव्ह जिहादवर राजकारण करत असाल तर तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बस नकवी यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा कसे? गौरी खान आणि आमिर खानचं लग्न झालं, हा लव्ह जिहाद नाही का? करीना कपूर आणि सैफ अली खान हा लव्ह जिहाद नाही? गल्लीत झालं तर प्रश्न उपस्थित करता मग दिल्लीतल्या लग्नांचं काय?

पठान चित्रपटावरून राम कदमांचं वक्तव्य आहे. तर तिथे भगव्या रंगाचा अश्लील वापर केल्याने चित्रपटावर बंदी आणायची, असं मध्य प्रदेश सरकार म्हणतंय. पैलवान लोक लंगोट घालतात, त्याचाही रंग भगवा असतो, यावरून मिटकरी यांनी भाजपला सुनावलं.

भाजप नेते राम कदम यांच्या दहिहंडीतील वक्तव्यावरही मिटकरींनी टीका केली. ते म्हणाले, ‘ राम कदम दहीहंडीच्या वेळी म्हटले होते, तुम्हाला कुठली मुलगी आवडली ते सांगा, तिथून उचलून आणतो, ही भाषा रावणाची होती. गाव हा जगाचा नकाशा आहे. तालुका, जिल्हा, विधानसभा, राष्ट्रपती ठरतो, त्यामुळे हे मुद्दे इथे महत्त्वाचे असल्याचं मिटकरी म्हणाले.

जळगावचे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही मिटकरी यांनी आरोप केला. सभेला उद्देशून ते म्हणाले, गिरीश महाजन यांनी माझे 13 सदस्य अपात्र ठरवले. आता सरकार बदललं, त्यामुळे जिथे जिथे राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायती आहेत, तिथे तक्रारी करा ग्रामपंचायती रद्द करतो, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय, त्यामुळे राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतींना नुकसात होत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.