अकोला : राज्यात नवं सरकार आल्यापासून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे सतत या नव्या सरकारवर निशाणा साधत आहेत. या नव्या सरकारच्या अनेक निर्णयावरून मिटकरी कडाडून टीका करत आहेत. मिटकरी यांचं भाषण कौशल्य ही तगडं आहे. त्यामुळे त्यांची बरीच भाषणं व्हायरल होत (Amol Mitkari Speech) असतात. मात्र आता अमोल मिटकरींचा एक असा व्हिडिओ चर्चेत आलाय यावरती मिटकरी यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. अमोल मिटकरी हे एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या पाया पडतानाच एक व्हिडिओ आता सोशल मीडिया वरती तुफान वायरल होतोय आणि रोज टीका करणारे मिटकरी एकनाथ शिंदे यांच्या पाया कसे पडत आहेत? असा सवाल नेटकरांकडून करण्यात येत आहे. त्या सवालालाच आता अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे.
या व्हिडिओबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, मी वारकरी संप्रदायाचा आहे आणि एकमेकांच्या पाया पडण्याची परंपरा आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत, ते वयाने मोठे आहेत. वडीलकीच्या नात्याने मोठे आहेत. तर तो जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ जुना असून 23 मार्च 2022 चा व्हिडिओ आहे. आता आज 16 जुलै 2022 असून अलीकडे एक-दोन दिवसात भाजपच्या आयटी सेल आणि काही लावारीस कार्टी जे व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यांना सांगतो की माझ्या वडिलांनी आणि माझ्या वारकरी संप्रदायांनी पाया पडण्याचे संस्कार मला दिलेत. त्यांच्यामुळे मी कोणाच्या पाया पडलोय हे महत्त्वाचं आहे आणि शिंदे साहेब त्यावेळी नगर विकास मंत्री होते, आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते शेवटपर्यंत वंदनीय आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
तर उद्या नरेंद्र मोदी मला दिसले तरी मी त्यांच्या पाया लागेल. नरेंद्र मोदींना जेव्हा पवार साहेब दिसतात तेव्हा ते पवार साहेबांच्या पाया लागतात. याचा अर्थ कोणी मोठा कोणी लहान होत नाही. पण लावारिस कारट्यांना काहीतरी माझ्याविरुद्ध बोलायला हवं असतं. पण हा आयटी सेल त्याचा ट्रोल करत असतो. पण शिंदे साहेब हे वडीलकीच्या नात्याने आम्हाला नेहमीच वंदनीय आहे, त्याच्यामुळे आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामुळे भाजपचेच आयटी सेलवाले माझे मुख्यमंत्र्यांसोबत अतिशय जवळीक आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, हा व्हिडिओ तीन-चार महिन्यापूर्वीचा आहे, त्यामुळे जास्त स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही, असेही ते म्हणाले आहेत.