अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईला रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते (Amravati MP Navneet Rana Who Tested COVID Positive Going To Mumbai For Treatment).
आता पुढील उपचारासाठी त्या मुंबईला येणार आहेत. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेणार आहेत. सध्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांच्या छातीत खूप दुखत असल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नवनीत राणा यांनां श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आणि त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्यामुळे वोकहार्ट रुग्णालयाच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना तात्काळ मुंबई नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवनीत राणा यांना रस्तेमार्गे रुग्णवाहिकेतून मुंबईला आणलं जात आहे.
आपल्या प्रकृतीची चिंता न करता आमदार रवी राणा हे देखील नवनीत राणा यांच्यासोबत रुग्णवाहिकेत आहेत. मुंबईत लीलवाती रुग्णालयात डॉ. जलील पारकरच्या मार्गदर्शनाखाली नवनीत राणा यांच्यावर उपचार होणार आहेत.
नवनीत राणा यांना कोरोनाची लागण
नवनीत कौर राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 6 ऑगस्टला नवनीत राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात आधीपासूनच उपचार सुरु आहेत. आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.
आधी खासदार नवनीत राणा, नंतर आमदार रवी राणांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, कुटुंबातील 12 जणांना संसर्गhttps://t.co/YaWaTW2k68
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2020
Amravati MP Navneet Rana Who Tested COVID Positive Going To Mumbai For Treatment
संबंधित बातम्या :