अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेवरुन राज्यात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठा हिंसाचार झाला. मुस्लिम समाजातील बांधवांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही काही समाजकंटकांकडून हिंसाचार घडवण्यात आला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना सिटी कोतवाली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिलीय. (Anil Bonde’s angry reaction to police action after Amravati violence)
महाराष्ट्रात आणीबाणी सुरु झाली आहे. ज्यांनी दंगल केली त्यांना राज्य सरकार अटक करत नाही. मात्र, कितीही अवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी हिंदू मार खाणार नाही, अशी प्रतिक्रिया देतानाच, ज्यांच्या घरात तलवारी आहेत त्यांच्या घरी झाडाझडती घ्या, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केली नाही तरी पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप बोंडे यांनी केला होता. त्यावरुन पोलिस आणि बोंडे यांच्यात शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली होती.
1. अनिल बोंडे, माजी कृषी मंत्री
2. तुषार भारतीय, भाजप गटनेते, अमरावती महानगरपालिका
3. संजय कुटे, आमदार
4. निवेदिता चौधरी, भाजपध्यक्ष
5. सुरेखा लुंगारे, नगरसेविका
6. चेतन गावंडे, महापौर अमरावती
7. शिवराय कुलकर्णी, भाजप प्रवक्ते
अमरावती शहरात 12 नोव्हेंबर रोजी मुस्लीम समाजाने मोर्चाचे आयोजन केले होते. त्रिपुरा राज्यात मशीद जाळण्यााच्या कथित घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर भाजपने अमरावतीमध्ये एक दिवसीय बंदचे आवाहन केले होते. आजच्या अमरावती बंदलादेखील गालबोट लागले. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करुन अश्रूधूरचा मारा केला. यामुळे भाजपचे नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे पोलिसांवर भडकले.
बोंडे व पोलिसांमध्ये राजकमल चौकात शाब्दिक चकमक उडाली. पोलीस व अनिल बोडे यांच्यात बाचाबाची झाल्याने या ठिकाणी पुन्हा आंदोलनकर्ते व पोलीस आमने-सामने आले. या बाचाबाचीमुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनिल बोंडे तसेच पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. या पूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, या अस्थिरतेला पूर्णपणे पोलीसच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपने केलाय.
इतर बातम्या :
विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकललं जाण्याची शक्यता, कारण काय?
Anil Bonde’s angry reaction to police action after Amravati violence