अमृता फडणवीस यांनी पोलीस सुरक्षा नाकारली, फडणवीसांवर विश्वास दाखवत म्हणाल्या…

| Updated on: Nov 02, 2022 | 5:15 PM

अमृता फडणवीस यांना देण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे...

अमृता फडणवीस यांनी पोलीस सुरक्षा नाकारली, फडणवीसांवर विश्वास दाखवत म्हणाल्या...
Follow us on

मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना देण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. पोलीस सुरक्षा नाकारताना त्यांनी सर्व लामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

काही दिवसांआधी महाविकास आघाडीतील नेत्याच्या सुरक्षेत कपात तर काही नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आली. तर अमृता फडणवीसांसह अन्य काही नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याबाबतचं एक वृत अमृता यांनी शेअर केलंय आणि त्यासोबत आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा त्यांनी नाकारली आहे.

मुंबई ट्रॅफिकचा दाखला त्यांनी या ट्विटमध्ये दिलाय.पण त्याचवेळी फडणवीसांच्या कामावर त्यांनी ठाम विश्वास दर्शवला आहे.

अमृता फडणवीस यांचं ट्विट

मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे आणि माझी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे की,
मला ट्रॅफिक क्लिअरन्स पायलट व्हेइकल देऊ नये. मुंबईतील ट्रॅफिकची स्थिती अतिशय निराशाजनक आहे. परंतु मला खात्री आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर मला विश्वास आहे. लवकरच इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकास प्रकल्पांद्वारे मुंबईत चांगली कामं होती आणि आम्हा मुंबईकरांना लवकरच आराम मिळेल, असं ट्विट अमृता यांनी केलं आहेत.