मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर नवा व्हिडीओ शेअर केला आहे. मिसेस फडणवीसांनी एक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली (Amruta Fadnavis praises Narendra Modi) आहेत.
राजधानी दिल्लीत भरलेल्या ‘हुनर हाट’ प्रदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. यावेळी एक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ मोदींनी ट्वीट केला होता. मोदींच्या याच ट्वीटला कोट करत अमृता फडणवीसांनी स्वतःचाही तत्सम वाद्य वाजवातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘तुम्हाला जर चांगला नेता व्हायचं असेल, तर तुम्हाला उत्तम नेत्याचा चांगला अनुयायी व्हावं लागतं’ असं अमृता फडणवीसांनी ट्वीट करताना इंग्रजीत लिहिलं आहे.
याशिवाय, ‘जे आपल्या प्रतिमेसाठी झटतात, ते घाबरतात. मी तर भारताच्या प्रतिमेसाठी जीव देतो, म्हणून कोणालाही घाबरत नाही’ हे पंतप्रधानांचं वाक्यही अमृता फडणवीसांनी पुढे जोडलं आहे.
If you wish to be a good leader, you must become a good follower of a great leader !!!
डरते तो वो है जो अपनी छवि के लिए मरते है ! मैं तो हिंदुस्तान की छवि के लिए मरता हूँ , इसी लिए किसी से भी नहीं डरता हूँ ! – आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi ji ! https://t.co/UhtTfFwTn6 pic.twitter.com/HQu8wYqNLu— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 20, 2020
Trying my hand at some music in #HunarHaat… pic.twitter.com/LQDV2DWcyO
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2020
अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ (Amruta Fadnavis praises Narendra Modi) नेमका कुठला आणि कधीचा आहे, याविषयी माहिती नाही. मिसेस फडणवीस वाजवत असलेल्या वाद्याचं नावही समजलेलं नाही.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला आपल्या युट्यूब चॅनलवर एक गाणं पोस्ट केलं होतं. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.
(Amruta Fadnavis praises Narendra Modi)