“दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?” अमृता फडणवीस-प्रियांका चतुर्वेदींचे ट्विटयुद्ध

| Updated on: Oct 23, 2020 | 12:35 PM

अ‍ॅक्सिस बँकेच्या सरकारी विभागाकडून पोलिस खात्यांचे संपादन करण्याचा निर्णय केवळ बँक तंत्रज्ञान आणि सेवेच्या आधारावर होते, असा दावा अमृता फडणवीसांनी केला

दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार? अमृता फडणवीस-प्रियांका चतुर्वेदींचे ट्विटयुद्ध
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांची पगार खाती ‘अ‍ॅक्सिस बँके‘तून ‘एचडीएफसी’मध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे ट्विटरवर वाकयुद्ध रंगले. दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? अशा शब्दात मिसेस फडणवीसांनी चतुर्वेदींना टोला लगावला. (Amruta Fadnavis taunts Priyanka Chaturvedi on Police Salary account transfer from Axis Bank to HDFC)

“एका गोष्टीचा मला पुनरुच्चार करायचा आहे, अ‍ॅक्सिस बँकेच्या सरकारी विभागाकडून (आधीची यूटीआय बँक) पोलिस खात्यांचे संपादन करण्याचा निर्णय केवळ बँक तंत्रज्ञान आणि सेवेच्या आधारावर होते. 29 ऑक्टोबर 2005 रोजी यासंबंधी शासन आदेश निघाला होता. घाणेरडे राजकारण प्रामाणिक आणि कणखर व्यक्तींना फसवू शकत नाही” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

“मुंबई पोलिस लवकरच अ‍ॅक्सिस बँकेतून 50 हजार पोलिसांची पगार खाती हस्तांतरित करतील. मनमानी करुन ज्या पद्धतीने बँकेची निवड करत राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराची खाती रातोरात हलवण्यात आली होती, हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यकच होता” असे ट्विट शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.

चतुर्वेदींच्या ट्विटला अमृता फडणवीसांनी उत्तर दिले. “अ‍ॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही, ही खाजगी क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून त्याच बँकेसाठी 18 वर्ष काम केले आहे. संधीसाधू दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? ही खाती 2005 आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार प्राप्त झाली होती.” असा टोला अमृता फडणवीसांनी चतुर्वेदींना लगावला. (Amruta Fadnavis taunts Priyanka Chaturvedi on Police Salary account transfer from Axis Bank to HDFC)

संबंधित बातम्या :

मुंबई पोलिसांचे पगार आता HDFC बँकेतून होणार

‘नशीब, मुख्यमंत्री स्वतःचं गुणगान ‘गात’ नाहीत’, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर

(Amruta Fadnavis taunts Priyanka Chaturvedi on Police Salary account transfer from Axis Bank to HDFC)