अमृता फडणवीसांनी शेअर केला फोटो, नेटिझन्स म्हणाले…

| Updated on: Nov 18, 2019 | 10:59 AM

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीराजांसोबत फोटो शेअर केलेल्या मिसेस फडणवीसांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.

अमृता फडणवीसांनी शेअर केला फोटो, नेटिझन्स म्हणाले...
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत पतीराजांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र नेटकऱ्यांनी मिसेस फडणवीसांना ट्रोल करण्याची (Amruta Fadnavis Twitter Photo) संधी सोडली नाही.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाचा चौदावा वाढदिवस 17 नोव्हेंबरला होता. फडणवीस दाम्पत्यावर राजकीय नेते, मित्र मंडळी आणि समर्थकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यासाठी आभार मानणारी एक पोस्ट अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केली.

पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत एक फोटो शेअर केला होता. ‘लोकांचे नेते (पिपल्स मॅन) श्री देवेंद्र फडणवीस यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असं अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत नेटिझन्सनी अमृता फडणवीस यांना चांगलंच ट्रोल केलं.

कोणी ‘मिसेस मुख्यमंत्री होण्याचं तुमचं स्वप्न पुन्हा साकार होवो’ अशा खोचक शुभेच्छा दिल्या. तर कोणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असूनही त्यांना मानवंदना न दिल्याबद्दल कानउघडणी (Amruta Fadnavis Twitter Photo) केली.