वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापुरातून मुंबईत

| Updated on: Aug 26, 2021 | 2:03 PM

बहुजन समाज पार्टीतून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला होता. त्यानंतर ते वंचितचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ते वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापुरातून मुंबईत
Follow us on

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aaghadi) प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive ) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या बरोबर सलगी त्यानंतर आज शहरातील विविध विकासकामांच्या निमित्ताने नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

बहुजन समाज पार्टीतून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला होता. त्यानंतर ते वंचितचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ते वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

आनंद चंदनशिवे 2017 च्या महापालिका निवडणुकीत, दोन नगरसेवकासह निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यात चंदनशिवे यांना 27 हजार मते मिळाली होती.

दरम्यान, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जर पक्षात प्रवेश केला तर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ नक्कीच वाढणार आहे. सध्या सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केवळ चार नगरसेवक असल्याने, आगामी पालिका निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इतर पक्षातल्या नेत्यांना पक्ष प्रवेश देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

18 महानगरपालिकांमध्ये ‘एक प्रभाग एक नगरसेवक’

पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये (Municipal Corporation) ‘एक प्रभाग एक नगरसेवक’  (One ward one corporator) पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महानगरपालिकांमध्ये सध्या एक प्रभाग चार नगरसेवक पद्धत प्रचलित आहे. ही पद्धत युती सरकारने सुरू केली होती. आता पुन्हा एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे.

कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये लागू होणार

पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महापालिका निवडणुका एक प्रभाग एक सदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

पुणे, पिंपरी चिंचवडसाठी आता ‘एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत’, महापालिकेत राजकीय समीकरणं बदलणार?