मुंबई : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू,” असा टोला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकरांना (anandraj ambedkar on aambedkar memorial) लगावला. “काही लोक उगाच स्मारकाच्या कामात अडथळा आणण्याचे काम करत आहेत,” असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
“इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा,” असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावरुन आनंदराज आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे.
“आंबेडकर स्मारक जर होत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू. रस्त्यावर उतरु. आंदोलनामुळे, परिश्रमामुळे बाबासाहेबांचं स्मारक होतंय आणि सरकार म्हणतंय पैसे नाही. यासारखं दुर्देव नाही,” असेही आनंदराज आंबेडकर (anandraj ambedkar on aambedkar memorial) म्हणाले.
“कोर्टाने सांगितलं की रुग्णालयांना द्यायला पैसे नाहीत. पण स्मारकासाठी आहेत. हे अत्यंत दुदैवी आहे. काही लोक उगीच स्मारकाच्या कामात अडथळा आणायचं काम करतायतं. त्याचा कुठलाच काहीच संबंध नाही,” असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
“आम्ही 350 कोटीत स्मारक बांधण्याचा प्लान दिला. सरकारने त्याची किंमत 1 हजार कोटीच्या घरात नेली. एमएमआरडीएच्या कॉन्ट्रॅक्टरसोबत साटलोटं आहे. 100 कोटी कसे आणि कोणत्या कामासाठी दिले, याची सखोल चौकशी व्हायला हवी. दलाली कोण खातंय, चौकशी करा. असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले. स्मारक बांधता येत नसेल, तर आमच्याकडे द्या,” असेही ते (anandraj ambedkar on aambedkar memorial) म्हणाले.