राजीनामा अडकणार? ऋतुजा लटकेंविरोधात ‘ही’ तक्रार

| Updated on: Oct 13, 2022 | 3:29 PM

सरकारी नोकरीतून राजीनामा मिळणं ऋतुजा लटके यांच्यासाठी आणखी कठीण असल्याचं दिसून येतंय.

राजीनामा अडकणार? ऋतुजा लटकेंविरोधात ही तक्रार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East By Poll) शिवसेनेच्या वतीने उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महापालिकेत (Municipal Corporation) क्लार्क असलेल्या ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा द्यावा लागतोय. मात्र पालिकेकडून राजीनामा मंजूरच होत नसल्याने ऋतुजा लटकेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

ऋतुजा लटकेंची कर्मचारी म्हणून असलेली कारकीर्द अतिशय स्वच्छ असल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत होता. मात्र अचानक काल म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी लटके यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि लायझनिंगची तक्रार करण्यात आली आहे.

महापालिकेचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. ही केस प्रलंबित आहे. म्हणून राजीनाम्याचा अर्ज प्रलंबित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ऋतुजा लटकेंचे वकील विश्वजित सावंत यांनी हे आता हायकोर्टात कशा प्रकारे युक्तिवाद करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचं हे प्रकरण आहे. येथील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र तत्पुर्वी त्यांचा राजीनामा महापालिकेकडून प्रलंबित आहे.