मोदींविरोधात मोर्चेबांधणी, चंद्राबाबूंचीच आंध्र प्रदेशातली सत्ता धोक्यात?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले असले तरी मुख्यमंत्री म्हणून त्यांना दुसरी संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण, एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा पक्ष टीडीपीचा दारुण पराभव होतोय. तर जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. इतर काही पोलमध्ये टीडीपीला सत्ता मिळणार असल्याचंही […]

मोदींविरोधात मोर्चेबांधणी, चंद्राबाबूंचीच आंध्र प्रदेशातली सत्ता धोक्यात?
Follow us on

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले असले तरी मुख्यमंत्री म्हणून त्यांना दुसरी संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण, एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा पक्ष टीडीपीचा दारुण पराभव होतोय. तर जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. इतर काही पोलमध्ये टीडीपीला सत्ता मिळणार असल्याचंही दाखवण्यात आलंय.

लोकसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंच्या पक्षाच्या जागा कमी होत आहेत. News18-IPSOS च्या पोलनुसार आंध्र प्रदेशात टीडीपीला 11 आणि वायएसआर काँग्रेसला 13 जागा मिळताना दिसत आहेत. सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, टीडीपीला 14 आणि वायएसआर काँग्रेसला 11 जागा देण्यात आल्या आहेत. तर एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार, टीडीपीला 4-6 आणि वायएसआरला 18-20 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणून दुसरी टर्म मिळणार?

आंध्र प्रदेश विधानसभेत एकूण 175 जागा आहेत. बहुमतासाठी 86 जागांची आवश्यकता आहे. लगडपती राजा गोपाल सर्व्हेनुसार (Lagadpati Raja Gopal Survey) टीडीपीला 90 ते 110 जागा मिळत आहेत, वायएसआरला 65-79 आणि इतरांना 1-4 जागा दाखवण्यात आल्या आहेत. आरजी फ्लॅश (RG Flash survey) नुसार टीही हेच आकडे दाखवण्यात आले आहेत. पण एक्सिस माय इंडियाचे आकडे यापेक्षा वेगळे आहेत. एक्सिस माय इंडियानुसार, टीडीपीला 37-40 आणि वायएसआरसाठी 130-135 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे चंद्राबाबूंनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. निकालाअगोदरच त्यांनी प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत. शिवाय यापूर्वीच 21 विरोधी पक्षांना घेऊन ते ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते.

संबंधित बातम्या :

23 मेनंतर या दोन राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार?

स्पेशल रिपोर्ट : चंद्राबाबू मोदींचा खेळ बिघडवणार?

Exit Polls : महाराष्ट्रातील अन्य एक्झिट पोलचे अंदाज एकाच ठिकाणी