मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thckeray) सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. पण राज्यात मात्र वेगळ्याच गोष्टी घडत आहेत. नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी तर थेट आदित्य यांच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं आहे. “आदित्य ठाकरेंचं लवकरच शुभ मंगल होवो आणि आम्हाला सीताबाईसारखी सून लाभो!”, असं अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत अनिल बोंडे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. ते टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत होते.
अनिल बोंडे यांना आदित्य ठाकरेंचे दोनाचे चार हात होण्याची खूपच उत्सुकता लागली आहे. “आदित्य ठाकरेंचं लवकरच शुभ मंगल होवो आणि आम्हाला सीताबाईसारखी सून लाभो!”, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. आदित्य ठाके अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले, याचा आनंद आहे. ते रामलल्लाचं दर्शन घेत होते अन् मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. लवकरात लवकर त्यांचे दोनाचे चार हात होवोत. अशी प्रार्थना रामलल्लाकडे केली असल्याचं बोंडे म्हणालेत.
शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, सेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे, दिपाली सय्यद तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित आहेत.आदित्य ठाकरे सध्या अयोध्येत आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. “आज आमची ही राजकीय यात्रा नाही. तिर्थयात्रा आहे. राम मंदिर निर्माण होतंय हे पाहून शिवसैनिकां भारावले आहेत. रामराज्य आणण्यासाठी रामलल्लांचं दर्शन घेतलंय. जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच आमचं हिंदुत्व आहे”, असं ते या पत्रकार परिषदेत म्हणाले. सध्या ते रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहे.. 6:00 वाजता लक्ष्मण किल्ल्यावर जाती. सात वाजता ते नया घाट या ठिकाणी शरयू आरती आरती करतील आणि मग लखनौसाठी निघतील.