मुंबई : काही वेळातच विधान परिषदेच्या (Legislative Council election) मतदानाला सुरूवात होतेय. त्याआधी खासदार अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार”, असं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे. काही वेळातच विधान परिषदेच्या मतदानाला सुरूवात होतेय. त्याआधी खासदार अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार”, असं ट्विट अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे.
“काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार”, असं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे.
काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा…#MLCElection2022 #MahaVikasAghadi
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
अनिल बोंडे यांनी विधान परिषद निवडणुकीत कुणाचा पराभव होणार याचं भाकित वर्तवलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच अनिल बोंडे यांनी हे सूचक ट्विट केलं आहे.
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश पाडवी हे रिंगणात आहेत.तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे निवडणूक लढवत आहेत. संख्याबळ पाहता काँग्रेसचा एक उमेदवार पराभीत होईल, असा अंदाज आहे. त्यावरच भाष्य करणारं आणि निवडणुकीच्या निकालाचं भाकित वर्तवणारं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे. मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे तडजोड करतील, असं बोंडे यांचं म्हणणं आहे. भाई जगताप किंवा चंद्रकांत हंडोरे यांच्या हातून निवडणूक निसणार असल्याचं बोललं जात आहे. पण तसं न होता आमश पाडवी यांचा या सगळ्या राजकारणात राजकीय बळी जाणार, असं बोंडेंनी म्हटलंय.