नवी दिल्ली : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Devendra Fadnavis) यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे. युतीतील आठवणींच्या मुद्द्यावरून त्यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. “फडणवीसजी, आठवणींबद्दलच बोलायचं असेल, तर आमच्याकडे तर 2009 पुर्वीच्या आठवणी!”, असं अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले आहेत.
जशा आठवणी फडणवीस यांच्याकडे आहेत, तशाच आमच्याकडेही आहेत. मात्र आम्ही त्याची वाच्यता करत नाही. आमच्याकडे 2009 च्या आणि त्यापूर्वीच्याही आठवणी आहेत. मात्र आम्ही भाष्य करणार नाही, असं देसाई म्हणालेत.
काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीवरही अनिल देसाई यांनी भाष्य केलंय. काही दिवसांपूर्वी वेषांतर करुन बैठका केल्या.आता पुन्हा बैठक होत आहेत. गुप्त बैठका होत आहेत. यातून काय साध्य होणार हे पाहावं लागेल, असं देसाई म्हणालेत.
आज दिल्ली उच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात सुनावणी होती. यावेळी ते बोलत होते.
आज दिल्ली उच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात सुनावणी झाली. दुपारनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी आज होतेय.निवडणूक आयोगाच्या विरोधात आज ठाकरे आणि शिंदे गटाकडून पुन्हा युक्तिवाद करण्यात आला.
उच्च न्यायालयातील सुनावणीवर बोलताना, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य असेल, असं देसाई म्हणाले.