मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. अशातच आता त्यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना छातीतलं दुखणं, उच्च रक्तदाब (Blood Pressure) आणि खांदेदुखीच्या तक्रारींनंतर मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईत मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडली. त्यानंतर यात सचिन वाझेचं नाव समोर आलं. सचिन वाझेपासून हे प्रकरण परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचलं. याच प्रकरणात जबाबदार धरत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तडखाफडखी बदली केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट अनिल देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. याच प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून देशमुख जेलमध्ये आहेत.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh admitted to ICU of KEM Hospital in Mumbai after he complained of chest pain, high BP and shoulder pain.
हे सुद्धा वाचाHe is currently in jail in connection with Money laundering matter pic.twitter.com/UitN5d3gUX
— ANI (@ANI) May 27, 2022
छातीतलं दुखणं, उच्च रक्तदाब (Blood Pressure) आणि खांदेदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख यांच्याकडून करण्यात येत होती. याची दखल घेत त्यांना आता केम रुग्णालयातील आयसीयूत दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र आता त्यांच्या तब्येतीबाबत फारशी माहिती मिळू शकलेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
वसुली टार्गेट आरोप प्रकरणात राष्ट्रवादीचे पहिले मंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले. त्याआधी सीबीआयने अनेकदा त्यांच्यावर छापेमारीही केली आहे. ही केस सीबीआयकडे गेल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारत अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गृहमंत्रिपदाची जबाबदारी ही दिलीप वळसे-पाटील यांना देण्यात आली. मात्र काही दिवसातच दुसऱ्या एका जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री नवाब मलिक यांनाही अटक करण्यात आली. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठीही भाजपने बराच जोर लावला मात्र राष्ट्रवादीने मलिकांचा राजीनामा घेतला नाही. त्यांनाही काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावरून बरेच राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले आहेत.