मुंबई : अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची CBI चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता CBIची टीम मंगळवारीच मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर लगेच याबाबतचा तपास सुरु होणार आहे. (CBI team will arrive in Mumbai tomorrow to interrogate Anil Deshmukh)
A team of CBI officers to arrive tomorrow in Mumbai to investigate the corruption allegations of former Mumbai Police Commissioner Param Bir Singh against Anil Deshmukh (File photo).
Bombay High Court today order CBI to start a preliminary inquiry within 15 days in the case. pic.twitter.com/PTF1aGASSV
— ANI (@ANI) April 5, 2021
मुंबई हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्का मानला जात आहे. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे.
संबंधित बातम्या :
देशमुखांना सीबीआयच्या जाळ्यात अडकवणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत?; वाचा सविस्तर
Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं
CBI team will arrive in Mumbai tomorrow to interrogate Anil Deshmukh