अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणाची पवारांकडून माहिती, दिल्लीतील भेटीचे तपशील गृहमंत्र्यांनी सांगितले

| Updated on: Mar 19, 2021 | 1:10 PM

शरद पवार यांनी मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली, असं अनिल देशमुख यांनी दिल्ली भेटीविषयी सांगितलं. (Anil Deshmukh Sharad Pawar Delhi Meeting)

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणाची पवारांकडून माहिती, दिल्लीतील भेटीचे तपशील गृहमंत्र्यांनी सांगितले
गृहमंत्री अनिल देशमुख
Follow us on

नवी दिल्ली : “नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील ताज्या घडामोडींविषयी चर्चा झाली” अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन अनिल देशमुख यांनी भेट घेतली. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर अनिल देशमुखांची खुर्चीही धोक्यात असल्याची चर्चा आहे. (Anil Deshmukh tells glimps of Discussion with Sharad Pawar in Delhi Meeting)

अनिल देशमुख काय म्हणाले?

“आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो. विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांनी साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली.” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल” अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली. गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही.

 

प्रशासकीय घडामोडींना वेग

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Bomb Scare), मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहा जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी दहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. शरद पवार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राजधानी दिल्लीत आहेत. संसदेतून परतल्यानंतर शरद पवारांची अनिल देशमुखांनी भेट घेतली. (Anil Deshmukh tells glimps of Discussion with Sharad Pawar in Delhi Meeting)

गृहमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे. अनिल देशमुख यांची खुर्ची वाचली, मात्र मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली.

संबंधित बातम्या :

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

शरद पवार-अनिल देशमुखांची दिल्लीत भेट, राजकीय परिस्थितीवर चर्चा

(Anil Deshmukh tells glimps of Discussion with Sharad Pawar in Delhi Meeting)