रत्नागिरी : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अलिशान रिसॉर्टची आज पाहणी केलीय. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबद्दल तक्रार केली होती. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी याबाबतची तक्रार फक्त जावडेकरच नाही तर ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही केली आहे. (Environment Department inspected Transport Minister Anil Parab’s resort in Dapoli)
अनिल परब यांचं दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एक अलिशान रिसॉर्ट बांधण्यात आलं आहे. आज केंद्रीय पथकाकडून या साई रिसॉर्टची पाहणी करण्यात आलं. कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्चुन अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी त्याबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली. या तक्ररीची दखल घेत केंद्रीय पथकाने आज या रिसॉर्टची पाहणी केलीय. आता केंद्रीय पथकाच्या अहवालावर परब यांच्या साई रिसॉर्टचं भवितव्य ठरणार आहे. तसंच परब यांच्या अडचणी वाढणार का? पे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
understood tomorrow 12 June representative of environment ministry Govt of India will visit #AnilParab Sai Resort Dapoli
भारत सरकारचा पर्यावरण मंत्रालयाचे प्रतिनिधी उद्या अनील परब चा साई रिसॉर्ट दापोलीची पाहणी करणार, असे समजले आहे @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 11, 2021
“पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली होती.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल कडे ही मी तक्रार केली आहे. pic.twitter.com/0lRONJTFmJ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 13, 2021
किरीय सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलंय. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असं अनिल परब म्हणालेत.
यापूर्वी सचिन वाझे यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे अनिल परब अडचणीत आले होते. सचिन वाझेंच्या या आरोपांना अनिल परब यांनी उत्तर दिलं होतं. परब यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. तसंच आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही परब यांनी म्हटलं होतं.
“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचं नाव घेण्यात आलं आहे”, असं परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण
अनिल परब दोन महिन्यांचे पाहुणे, मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ; किरीट सोमय्यांचा दावा
Environment Department inspected Transport Minister Anil Parab’s resort in Dapoli