Anil Parab: अनिल परबांना अटक होणार? छाप्यादरम्यान परबांची काय रिएक्शन? पाहा EXCLUSIVE VIDEO

| Updated on: May 26, 2022 | 10:14 AM

Anil Parab ED News : याआधी नवाब मलिक आणि अनिल देशमुख या महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनाही ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.

Anil Parab: अनिल परबांना अटक होणार? छाप्यादरम्यान परबांची काय रिएक्शन? पाहा EXCLUSIVE VIDEO
अनिल परब, परिवहन मंत्री
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर सातत्यानं भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले. अनिल परबांच्या दापोलीच्या रिसॉर्टवरही अनेकहा किरीट सोमय्यांनी सनसनाटी आरोप केले होते. दरम्यान आता अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल परब यांच्या खासगी निवासस्थानासह त्यांच्या शासकीय निवासस्थानीदेखील ईडीनं छापेमारी (Anil Parab ED Raid News) केली. गुरुवारी सकाळपासून या छापेमारीला सुरुवात करण्यात आली. ईडीचे वरीष्ठ अधिकारी तेहसीन सुलतान या छापेमारीचं नेतृत्त्व करत असल्याची माहिती समोर आली. मुंबई, पुण्यासह रत्नागिरीतही ही छापेमारी करण्यात आल्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ईडी छाप्यादरम्यान, अनिल परब हे शासकीय निवासस्थानी हजर असल्याचंही टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. त्यांची आज कसून चौकशी केली जाण्याची शक्यताय.

काय होती रिएक्शन?

परिवहन मंत्री अनिल परब हे शिवालय या आपल्या शासकीय निवासस्थानी हजर होते. त्याच दरम्यान, ईडीनं गुरुवारी सकाळी धाड टाकली. ईडीचे वरीष्ठ अधिकारी तगड्या बंदोबस्तासह अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या शिवालय बंदल्यावर धडकले. फक्त शिवालयच नव्हे तर मुंबईतील वांद्रे येथील अनिल परबांच्या खासगी बंगल्यावरही ईडीचे अधिकारी पोहोचले होते. महत्त्वाचं म्हणजे शिवालय या बंगल्या सुरु असलेल्या छापेमारीदरम्यान, अनिल परब काय करत होते, हे टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झालंय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

शिवालय या बंगल्यातील छापेमारी दरम्यान, कैद झालेली अनिल परब यांची छबी काळजी वाढवणारी होती. ईडीच्या छापेमारीने आश्चर्य वाटावं, अशी अनिल परबांची देहबोली नसली, तरी त्यांच्या डोळ्यात काळजी दिसून येत होते. शिवालय या बंगल्यात सुरु असलेल्या छापेमारीदरम्यान, ईडीचे वरीष्ठ अधिकारी तेहसीन सुलतान हे उपस्थित होते. यावेळी सीआरपीएफची एक तुकडीदेखील शिवालय बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण खबरदारी यावेळी घेण्यात आली होती.

अनिल परबांना अटक होणार?

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आता अनिल परबांची प्राथमिक चौकशी ईडी अधिकाऱ्यांकडून केली जातेय. दरम्यान याआधी नवाब मलिक आणि अनिल देशमुख या महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनाही ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता अनिल परबांवर गुरुवारी ईडीनं धाड टाकल्यानं चर्चांना उधाण आलंय. चौकशीनंतर आता अनिल परब यांनाही अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचप्रमाणे ईडीची छापेमारी नेमकी किती वेळ चालते, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.

काय आरोप?

अनिल परब हे महाविकास आघाडी सरकारमध्ये परविहन मंत्री आहेत. त्याच्यावर किरीट सोमय्या यांनी दापोलीतील रिसॉर्टवरुन सनसनाटी आरोप केलेले होते. तसंच अटकेत असलेल्या सचिन वाझेनंही पत्र लिहून बदल्यांमधील भ्रष्टाचार, बीएमसीतील कंत्राट देण्यात आर्थिक गैरव्यवहार, असे आरोप करण्यात आले. वेगवेगळ्या आरोपांप्रकरणी ईडीनं अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल करुन आता छापेमारीला सुरुवात केली आहे. सध्या याप्रकरणी चौकशी केली जातेय.