मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीसांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन(Vedanta-Foxconn) आणि बल्क ड्रग पार्क(Bulk Drug Park) या दोन मोठ्या प्रकल्पांपाठोपाठ आता आणखी एक बडा प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेला असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. मेडिसिन डिव्हाईस पार्क(Medicine Device Park) योजनाही महाराष्ट्र बाहेर गेली आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी(Sabha MP Priyanka Chaturvedi) यांचे ट्विट रिट्विट करत आदित्य ठाकेरेंनी हा आरोप केला आहे.
शंभाजीनगर आणि नव्याने निर्माण होणाऱ्या स्मार्ट सिटी येथे मेडिसीन डिव्हाईस पार्क बनवण्याची योजना होती. साडेतीनशे एकरात, केंद्र सरकारची ग्रँटनेट योजना आहे. राज्यात ही योजना आणावी अशी मागणी आम्ही केली होती असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.
संसदेच्या विशेष उल्लेखात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. ज्याचे उत्तर नुकतेच आले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 16 राज्यांनी दिले होते, त्यापैकी 4 राज्ये दिली आहेत, त्यात महाराष्ट्र नाही असे ट्विट प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.
फॉक्सकॉन वेदांत ज्या प्रकारे आमच्याकडून हिरावून घेतला गेला, ड्रग्ज पार्क ज्या प्रकारे हिरावून घेतला गेला, तसाच हा प्रकल्प महाराष्ट्रातू काढून घेतल्याचा प्रियांका चतुर्वेदींचा आरोप आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांचे ट्विट रिट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तळेगावातून निघून गेला. बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. आता मेडिसीन डिव्हाइस पार्क राज्याबाहेर गेला आहे, राज्य सरकारला याची माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी ट्विट रिट्विट करत उपस्थित केला आहे.
After the exit of Vedanta- Foxconn and the Bulk Drug Park, Maharashtra has now been left out of Medicine Device Park scheme as well.
Despite having best infrastructure and skill pool, another project denied to Maharashtra.
Does the governing dispensation know? https://t.co/zrXmSUTdDK
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 25, 2022
आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलट सवाल केला आहे. मेडिसीन डिव्हाइस पार्क प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता याचा एक चिठ्ठीचा पुरावा त्यांनी दाखवावा असे फडणवीस म्हणाले आहेत.