मुंबई : जवळपास 8 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे. त्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. संध्याकाळी 6 वाजता महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, आज होणारी ही भेट रद्द झाल्याची माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितलं होतं की, राज्यपाल कोश्यारी यांनी आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर भेटण्यासाठी बोलावलं आहे. त्यानुसार आज ही भेट होणार होती. मात्र आता ही भेट होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. (Mahavikas Aghadi leader and Governor Bhagat Singh Koshyari’s meeting canceled)
राज्य सरकार माझ्याकडे 12 सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता?; असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला केला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका केली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी 20 ऑगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं होतं. राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना जाऊन भेटणार आहोत, असं अजित पवार म्हणाले होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.
अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.
इतर बातम्या :
‘भाजप-सेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’, सदाभाऊंचा जोरदार टोला
“शिवसेना-भाजपमधील वाद राजकारणाचा भाग, ते घरात एकत्र बसून जेवणही करु शकतात”
Mahavikas Aghadi leader and Governor Bhagat Singh Koshyari’s meeting canceled