मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आक्रमक नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar )हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. आता त्यांनी स्वत: आपण शिंदेगटाला (Eknath Shinde) समर्थन देत असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी ते भावून झाल्याचं पाहायला मिळालं. रडत-रडत त्यांनी आपली भूमिका मांडली. “उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) बोलणं झालं. सकाळी सविस्तर बोललो. माझ्यावर जी परिस्थिती बितत आहे ते सांगितलं. मी त्यांच्या कानावर सर्व गोष्टी टाकल्या. राऊत विनोद घोसाळकर यांच्याशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. 40 वर्षापासून. घरी आल्यावर परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करण गरजेचं आहे. मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली. त्या संदर्भात जे काही बोलायचं ते बोलले. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तरी परिस्थिती आहे म्हणून मी निर्णय घेतला आहे, असं म्हणत अर्जुन खोतकरांनी इथून पुढे आपण शिंदेगटाचा भाग असणार असल्याचं जाहीर केलं.
मी आधी चारवेळा त्यांना फोन केला. व्हॉट्सअप कॉलवरून बोललो. ईडीची पिडा जाईल हे मी कसं सांगू शकतो. मी सहारा शोधला. थोडाफार तरी सहारा मिळेल.
“रावसाहेब दानवेंनी मला चहा घ्यायला बोलावलं. अडीच वर्षाने त्यांनी मला बोलावलं. ते म्हणाले अर्जुनराव काय करताय. मी म्हटलं मला लोकसभा लढवायची आहे. ते म्हणाले, सोडता येणार नाही ती जागा आमची आहे. मी म्हणालो हा निर्णय शिंदे फडणवीसांवर सोडा. आता हा शिंदे फडणवीसांकडे निर्णय आहे. मी आग्रह सोडला नाही”, असंही त्यांनी सांगितलं.
“विधान परिषद वगैरे मी अट ठेवली नाही. ही अफवा असेल मी एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असं सांगितलं नाही.
मी उद्धव ठाकरेंबद्दल काहीच बोलणार नाही. 40 वर्ष मी पक्षात काम केलं आहे. मी उपनेते पदाचा राजीनामा देणार. मेसेज टाकला आहे. एखाद्या प्रसंगाने भेटायची वेळ आली तर मातोश्रीवरही जाईल”, असंही खोतकरांनी स्पष्ट केलंय.
“आम्ही आयएमससाठी अर्ज केला. रजिस्ट्रेशनसाठी. रजिस्ट्रेशन मिळालं. २०१४ला आमचं नाव लागलं. नंतर ५०० ते ६०० कर्मचारी कोर्टात गेले. दावे दाखल केले. नंतर दुष्काळ पडला. त्यामुळे कारखाने सुरू झाला नाही. २०१९मध्ये वसंतदादा शुगरकडून डीपीआर करून घेतला. नंतर कोरोनामुळे कारखाना बंद राहिला. मी दिवाळी कार्यक्रमात कारखाना सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर या प्रश्नाला वेगळं वळण लागलं. प्रकरण कोर्टात आहे. काही कारवायांमुळे कारखाना सुरू केला नाही. त्याचं शल्य आहे”, असंही खोतकर म्हणाले.