जेटलींची प्रकृती अत्यंत चिंताजनक, एम्समध्ये दिग्गज नेत्यांची रीघ

| Updated on: Aug 19, 2019 | 11:01 PM

रुग्णालयात जाऊन अनेक नेत्यांनी जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एम्समध्ये जाऊन जेटलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.

जेटलींची प्रकृती अत्यंत चिंताजनक, एम्समध्ये दिग्गज नेत्यांची रीघ
Follow us on

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley health) यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक सांगितली जात आहे. श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यानंतर त्यांना (Arun Jaitley health) उपचारासाठी 9 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात जाऊन अनेक नेत्यांनी जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एम्समध्ये जाऊन जेटलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.

अरुण जेटली यांना कार्डियो-न्यूरो सेंटर मध्ये एक्सट्रॉकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशन (ECMO) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (IABP) सपोर्टवर ठेवण्यात आलंय. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्सकडे धाव घेतली.

महत्त्वाच्या अपडेट्स –

  • प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांना एम्सला भेट दिली. सोबतच कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हाही एम्समध्ये दाखल झाले.
  • माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही विचारपूस केली.
  • आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे हे एम्समध्ये दाखल झाले.
  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, त्यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांनीही जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
  • केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनीही जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
  • हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्रा, आरएसएसचे संयुक्त महासचिव डॉ. कृष्ण गोपाल आणि सपाचे माजी नेते अमर सिंह हे देखील एम्समध्ये दाखल झाले.