मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shiv sena) आणि शिंदे गटात जोरदार शाद्बिक चकमक सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आमच्याच दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होणार असा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप देखील सुरू आहेत. आज मात्र शिंदे गटावर टीका करताना शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी खालच्या पातळीवर टीका केल्याचं पहायला मिळालं. त्यांनी ट्विट (tweet) करत शिंदे गटावर निशाणा साधला. ‘शिंदे गटाला काय माहिती निष्ठा, भुलथापा देतायेत खावून विष्ठा, एकीकडे निष्ठेचा दसरा तर दुसरीकडे लाचार बेईमान आणि कचरा’ अशा शद्बात अरविंद सावंत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
अरविंद सांवत यांनी ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘एक तरफ लाचार एक तरफ सदाचार, एक तरफ बेईमान एक तरफ निष्ठावान, एक तरफ दसरा एक तरफ कचरा, बिके हुये क्या जाने निष्ठा गुमराह कर रहे खाकर विष्ठा !’ असं ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे. अरविंद सावंत यांच्या या टीकेनंतर दसरा मेळाव्यारून पुन्हा एकदा राजकारण तापण्याचे चिन्ह आहे.
यंदा दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आपल्याच मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी झाली पाहिजे यासाठी शिवसेना अणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्याला जमलेली गर्दीच सांगेल खरी शिवसेना कोणती अशी वक्तव्य देखील अनेकदा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहेत. आज अरविंद सावत यांनी देखील याच पार्श्वभूमीवर हे ट्विट केलं आहे. यानंतर शिंदे गट आता टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.