हैदराबाद : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे असेल, तर ते दोन घोड्यावर बसू शकत नाहीत, अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उद्धव ठाकरे (Asaduddin Owaisi criticism on Uddhav Thackeray) यांच्यावर केली.
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यावरुन सुरु असलेल्या गोंधळात आता असदुद्दीन ओवेसी यांनी उडी मारली आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये काही फरक नाही, दोघंही एकच आहेत, असं औवेसी म्हणाले. तसेच सत्तेच्या वाट्यावरुन आणि अवकाळी पावसावरुन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, यावरुनही ओवेसी यांनी सरकारवर निशाणा साधला.
A Owaisi:What is this 50-50,is this a new biscuit?How much 50-50 will you do?Save something for Maharashtra’s public.They (BJP&Shiv Sena) are not bothered about the destruction rain has caused in Satara. All they talk about is 50-50.What kind of ‘Sabka Sath Sabka Vikas’ is this? pic.twitter.com/Ct4DFRLnDp
— ANI (@ANI) November 3, 2019
“उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे असेल, तर ते दोन घोड्यावर बसू शकत नाही. असं वाटतं की उद्धव ठाकरे मोदींना घाबरले आहे. अरे हा 50-50 फॉर्म्युला नेमका काय आहे. हे काय नवीन बिस्कीट आहे”, असंही म्हणत ओवेसी यांनी शिवसेना-भाजपची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
“एकिकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ते आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा संगीत खूर्ची खेळत आहेत. एमआयएम ना भाजपचे ना शिवसेनेचे समर्थन करणार. उद्धव ठाकरे मोदींना घाबरतात. दोन पाऊल पुढे जातात आणि तीन पाऊल मागे येतात. जर घाबरत नसाल, तर केंद्रातील आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा. शिवसेना आता जरी अशी वागत असली तरी नंतर मराठा आणि हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो”, असं म्हणेल, अशी टीका ओवेसी यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सहज सरकार स्थापन करु शकतात. पण अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. तसेच सत्तेतील काही महत्त्वाची खातीही मिळावीत. त्यामुळे शिवसेना यंदा सत्तेत समान वाटा मागत आहे. पण भाजपाकडून या फॉर्म्युलासाठी सकारात्मक असे उत्तर येत नाही.
व्हॉट्सअॅप प्रायव्हसीवर ओवेसींची टीका
“व्हॉट्सअॅप प्रायव्हसीवर असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. नागरिकांच्या प्रायव्हीसीची रक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे. इजरायली कंपनीद्वारे Pegasus नावाच्या स्पायवेअरने आपल्या प्रायव्हसीवर हल्ला केला आहे. तुम्ही का गप्प आहे, कारवाई का करत नही”, असंही ओवेसी म्हणाले.