हैदराबाद : निवडणुकांच्या तोंडावर पैशांच्या मोबदल्यात मत विकण्याचा सल्ला देणारे महाभाग नेते नवीन नाहीत. या यादीत आता ‘एमआयएम’चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भर पडली आहे. काँग्रेसकडे खूप पैसा आहे, तो घ्या आणि मला मतदान करा, असं जाहीर आवाहनच ओवेसींनी तेलंगणातील एका सभेत (Asaduddin Owaisi on cash and vote) केलं.
काँग्रेसमधील लोकांकडे खूप पैसा आहे, त्यांच्याकडून घ्या. तुम्हाला माझ्यामुळे पैसा मिळेल. फक्त मला मतदान करा. जर ते तुम्हाला (पैसे) देत असतील तर ते घ्या. मी काँग्रेसला दर वाढवण्यास सांगतो. माझी किंमत केवळ दोन हजार रुपये नाही. माझी योग्यता त्यापेक्षा जास्त आहे, असं ओवेसी म्हणाले.
Asaduddin Owaisi, on violence in Telangana’s Bhainsa: Yesterday’s incident is condemnable. I demand the CM to take action against all culprits. I also demand him to provide compensation to everyone who suffered losses. I appeal to the people of Bhainsa to maintain peace. (13.01) https://t.co/Ys4vVnx2fg
— ANI (@ANI) January 14, 2020
तेलंगणमधील भैंसामध्ये दोन समुदायांमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरही ओवेसींनी भाष्य केलं. मी मुख्यमंत्र्यांकडे सर्व दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करतो. तसंच पीडितांना नुकसानभरपाई दिली जावी, अशीही मागणी ओवेसींनी केली आहे.
काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनीही अशाचप्रकारचं वक्तव्य केलं होतं. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यशोमती ठाकूर यांनी मतदारांना अनोखा सल्ला दिला होता.
‘जे लोकं आपल्या विरोधात आहेत, त्यांचे खिसे बंबाटच भरले आहेत. आणि त्यांचे खिसे खाली करायला आपल्या घरी येतच असंल ना. तो उनको नही मत बोलना, घर पे आयी लक्ष्मी को कौन नहीं बोलता है? अरे लेकिन वोट पंजे को डालना’ असं ठाकूर भाषणादरम्यान म्हणाल्या होत्या.
लक्ष्मीदर्शनाचा दानवेंचा सल्ला
भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही डिसेंबर 2016 मध्ये अशाप्रकारचा सल्ला दिला होता. पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी ‘लक्ष्मीदर्शना’संबंधी वक्तव्य केलं होतं. ‘निवडणुकीच्या एक दिवस आधी लक्ष्मी दर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली, तर तिला परत करु नका, उलट तिचे स्वागत करा,’ असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं.
Asaduddin Owaisi on cash and vote