नागपूरमधून मलाच उमेदवारी, आशिष देशमुख यांचा दावा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून मलाच उमेदवारी मिळणार आहे, असा दावा भाजपमधून काँग्रेसमध्ये परतलेले आशिष देशमुख यांनी केला. भाजपकडून विधानसभेला निवडून आलेल्या आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा इशारा दिला. आज मात्र त्यांनी काँग्रेसकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा टीव्ही 9 […]

नागपूरमधून मलाच उमेदवारी, आशिष देशमुख यांचा दावा
Follow us on

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून मलाच उमेदवारी मिळणार आहे, असा दावा भाजपमधून काँग्रेसमध्ये परतलेले आशिष देशमुख यांनी केला. भाजपकडून विधानसभेला निवडून आलेल्या आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा इशारा दिला. आज मात्र त्यांनी काँग्रेसकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा टीव्ही 9 मराठीकडे केला.

“काँग्रेस पक्ष हे माझे घर आहे. मी भाजपामध्ये गेलो होतो ही चूक होती. परंतु आता मी काँग्रेसमध्ये परत आलो आहे. मला नागपूरमधून काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल. नागपूर लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ आहे. यामुळे मला काँग्रेसची नागपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळेल”, असे देशमुख म्हणाले.

इतकंच नाही तर नागपूरमधून काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी निवडून येईल, असा दावा आशिष देशमुख यांनी केला.

2014 मधील निवडणूक निकाल

2014 मध्ये झालेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा दारुण पराभव झाला आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी 2 लाख 85 मतांनी विजय मिळवला.  गडकरींना 54.17 टक्के मतं मिळाली होती. आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा हा सर्वात मोठा विजय होता.

संबंधित बातम्या 

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?