मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनीही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा? त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशी जळजळीत टीका फडणवीसांनी शिवसेनेवर केलीय. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. (Ashish shelar criticize shivsena on Bhagva on backdrop of BMC election)
‘105 हुताम्यांवर ज्यांनी गोळीबार केला. कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली. याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला. ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला. त्यांच्या सोबत्त सत्तेत बसलात. तेव्हाच “भगव्याचा” रंग तुम्हीच फिका केलात. भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात’, अशा शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं.
105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला.. कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला…ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला त्यांच्या सोबत सत्तेत बसलात…
तेव्हाच “भगव्याचा” रंग तुम्हीच फिका केलात…भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात..
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 20, 2020
‘भ्रष्टाचाराला कंटाळून मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची. विकासाची गुढी उभारतील. गुढीला “शुध्द भगव्याची” झालर चढवतील..! तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा. मुंबईकरांना चँलेज देताय. मुंबईकरच आता “करुन दाखवतील”!’असं ट्वीट करुन मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपची भूमिकाही शेलार यांनी स्पष्ट केली आहे. शेलार यांनी यापूर्वीच मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत शिवसेनेला डिवचलं आहे.
भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची..विकासाची गुढी उभारतील..
गुढीला “शुध्द भगव्याची” झालर चढवतील..!
तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा…
मुंबईकरांना चँलेज देताय..
मुंबईकरच आता “करुन दाखवतील”!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 20, 2020
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा, त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशा जळजळीत शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ‘भगवा झेंडा हा आता शिवसेनेचा राहिलेला नाही. शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली. त्यामुळे शिवसेनेने भगव्या झेंड्याचा अपमान केला आहे’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
‘मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. ‘मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल’ असा थेट इशारा शिवसेनेकडून भाजपला करण्यात आला आहे. दरम्यान, ‘मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे’ अशा शब्दात शिवसेनेनं भाजपला उत्तर दिलं आहे.
‘मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर…’ शिवसेनेचा भाजपला इशारा
शिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली
Ashish shelar criticize shivsena on Bhagva on backdrop of BMC election