मुंबई : कुणाच्या कळा, कुणाचं बाळंतपण आणि कुणाच्या मांडीवर बाळ हे सर्वांना कळतं असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी राज ठाकरे (raj thackeray) आणि भाजपवर निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला (bjp) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं पत्रं देण्यात आलं होतं. त्यावरूनच किशोरी पेडणेकर यांनी ही टीका केली. त्याच्या या टीकेवर आता भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जबरदस्त पलटवार केला आहे.
अंगात नाही बळ आणि कळ काढून पळ… शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हे धंदे बंद करावेत असं म्हणत त्यांनी थेट ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
अंधेरी पोट निवडणूक मधून उमेदवार माघे घेऊन भाजापने महाराष्ट्रची उच्च राजकीय परंपरा जपण्याच्या काम केले आहे असं म्हणत त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवार मागे घ्यावे असं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते. यानंतर भाजपने उमेदवार मागे घेतल्याची चर्चा आहे.
या पत्रावरुन किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला. कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सगळ्यांना कळतं आहे.
भाजप आणि ईडी सरकारला मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आणि भोंगे लागतात. पत्रं लिहिणाऱ्यांना एक विनंती आहे. आपल्या हातून फॉस्कॉन जाऊन पॉपकॉर्न आला आहे, त्याबद्दलही एक पत्रं लिहावं असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.