ठाणे : राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडीची झोप उडेल, असे सूतोवाच भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज ठाण्यात केले. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केले आहे. त्याचे प्रतिबिंब राज्यात लवकरच दिसेल, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात गीता पठण व वंदे मातरम गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेलार बोलत होते. (Ashish Shelar says After defeat in Legislative Assembly elections BJP has introspected)
आशिष शेलार म्हणाले की, एकीकडे कायम हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली तर दुसरीकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत ठाणे भाजपतर्फे गीता पठणाची स्पर्धा ठेवण्यात आली. यावरुन खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना अजान स्पर्धा आयोजित करते, तर भाजपने ठिकठिकाणी गीता पठण आणि वंदे मातरम गायनाचे आयोजन करुन राष्ट्रभक्तीच्या दृष्कीकोनातून एक पाऊल पुढे टाकले आहे. यातून शिवसेनेने थोडीशी अक्कल घ्यावी.
शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका
गेल्या महिन्यात भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचं मत शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर शिवसेनेवर भाजपने जोरदार टीका सुरु केली. शिवसेनेने मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन करण्याची घोषणा करताच त्यावर भाजपकडून टीका सुरु झाली. शिवसेनेने आता खांद्यावर हिरवा झेंडा घेणंच बाकीय उरलंय, अशी खोचक टीका भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती.
अजानमध्ये गोडवा असतो : शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ
मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे, असं पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
लहान मुलांसाठी शिवसेनेची अजान स्पर्धा; अजानला विरोध करणं गैर: पांडुरंग सकपाळ
शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका
Ashish Shelar says After defeat in Legislative Assembly elections BJP has introspected