हातात पेपर दाखवत अशोक चव्हाण काय बोलले? बोम्मई सरकारचा कोणता दावा खोटा असल्याचा आरोप?

| Updated on: Dec 19, 2022 | 2:38 PM

कर्नाटक सरकारच्या मते, हे ट्विटर हँडल फेक असेल तर त्यांनी तातडीने हे ट्विट डिलीट करावे, महाराष्ट्र सरकारने याचा निषेध करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

हातात पेपर दाखवत अशोक चव्हाण काय बोलले? बोम्मई सरकारचा कोणता दावा खोटा असल्याचा आरोप?
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून (Maharashtra Karnataka border dispute) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी ज्या ट्विटर हँडलवरून ते हँडल बनावट असल्याचा दावा केला जातोय. मात्र हा दावा खोटा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. हे ट्विटर हँडल बनावट असतं तर ते तेव्हाच डिलीट का नाही केलं? असा सवाल चव्हाण यांनी केला.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. अधिवेशन परिसरात अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर हँडलवरील ट्विटचे प्रिंट त्यांच्या हातात होते. त्यातील संदर्भ देत चव्हाण यांनी कर्नाटक सरकारविरोधात आरोप केले.

अशोक चव्हाण म्हणाले, ‘ कर्नाटक सरकारने हे ट्विटर हँडल फेक असल्याच्या बातम्या सोडल्या आहेत. महाराष्ट्राला सबुरीने घेण्याचा सल्ला दिलाय. पण महाराष्ट्राने विषयाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही. जे फेक असल्याचा दावा केला जातोय, हे हँडल व्हेरिफाइड असल्याचं दिसतंय.

अशोक चव्हाण यांनी खुलाशादाखल काही ट्विटचा उल्लेख केला. हे हँडल फेक असेल तर कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीदेखील यावर कशी दिली आहे? असा सवाल त्यांनी केला.

हातात पेपर दाखवत अशोक चव्हाण काय बोलले? बोम्मई सरकारचा कोणता दावा खोटा असल्याचा आरोप?
याच हँडलवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कर्नाटक सीमाप्रश्नावर त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोपही बोमई यांनी केला. तसेच सांगली, सोलापुरातील गावांनी कर्नाटकात सामिल व्हावे, असं वक्तव्य या हँडलवरून करण्यात आलं होतं.

2004 पासून महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे. त्याला यश येणार नाही, आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे, या तीन वक्तव्यांचा दाखला अशोक चव्हाण यांनी दिला.

कर्नाटक सरकारच्या मते, हे ट्विटर हँडल फेक असेल तर त्यांनी तातडीने हे ट्विट डिलीट करावे, महाराष्ट्र सरकारने याचा निषेध करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.