अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य सरकारची असमर्थता दर्शविणारे, प्रवीण दरेकरांची टीका

| Updated on: Oct 27, 2020 | 4:20 PM

"मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांचं विधान सरकारची असमर्थता दर्शविणारे असून सरकारची हतबलताच यातून दिसून येते, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

अशोक चव्हाणांचं ते वक्तव्य सरकारची असमर्थता दर्शविणारे, प्रवीण दरेकरांची टीका
Pravin Darekar
Follow us on

मुंबई : “मराठा आरक्षणाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांचं विधान सरकारची असमर्थता दर्शविणारे असून सरकारची हतबलताच यातून दिसून येते, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ज्यांना सरकारवर विश्वास नसेल त्यांनी मराठा आरक्षणासाठी आपला वकील लावावा असे अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर दरेकर यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. (Ashok Chavan’s statement show that government is incapable to provide maratha reservation criticizes Pravin Darekar)

प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. “अशोक चव्हाण यांचं बोलणं हे मराठा सामाजाप्रति सरकार असमर्थ असल्याचं लक्षण आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी काहीतरी करु, असं चव्हाण यांनी म्हणायला हवं होतं. मराठा आरक्षणाबाबत सरकार हतबल झाल्याचं दिसत आहे.” असं प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच भविष्यात सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न आत्मविश्वासाने मार्गी लावेल याबाबत शंका निर्माण होते, असा अविश्वासही त्यांनी सरकारप्रती व्यक्त केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खडंपीठासमोर आज (27 ऑक्टोबर) झालेल्या युक्तीवादात, सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा युक्तिवाद झाल्यानंतर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपलं म्हणणं मांडावं असंही कोर्टाने नमूद केलं.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

“मराठी आरक्षणावरील सुनावणी ही खंडपीठाकडे न घेता ती घटनापीठाकडे व्हावी, अशाप्रकराची आमची भूमिका आहे. तशीच भूमिका आज सर्वोच्च न्यायालयात मांडली जाईल. हा विषय घटनापिठाकडे जावा, असाच युक्तिवाद केला जाईल, अशी आमची भूमिका आहे.” असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते. तसेच, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation Hearing) काही जण राजकारण करत आहेत. जर त्यांना सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा, असे चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले असून त्यांनी अशोक चव्हाण आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या : उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी काय नुसती भजी खायची का?; विनायक मेटे भडकले

Maratha Reservation | अशोक चव्हाणांना फोन करुन काय करायचं, त्यांना या गोष्टी माहिती नाही?; खासदार संभाजीराजे संतापले

Maratha Reservation | अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा: दिलीप पाटील

(Ashok Chavan’s statement show that government is incapable to provide maratha reservation criticizes)