पुणेः महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भीमाशंकर (Bhimashankar) ज्योतिर्लिंगाचा (Jyotirling) वाद पेटलाय. भाजपच्या (BJP) नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही, असंच ठरवलंय का? आधी राज्याच्या वाट्याचे उद्योग पळवले, रोजगार पळवले आणि आता चक्क सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. ईडी सरकारने गुवाहटीला आमदारांची फौज पळवून नेली. तिथे अदृश्य शक्तीच्या स्वरुपात आसाम सरकारने मदत केली. आणि त्याच्या बदल्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये देऊन तर आला नाहीत ना, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. आसाम सरकारच्या एका जाहिरातीत पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलंय.
आसाम सरकारने आगामी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ६ वं ज्योतिर्लिंग कामरुप डाकिनी पर्वत आसाममध्ये आपलं स्वागत आहे, अशा आशयाची ही जाहिरात आहे.याच यादीत विविध ज्योतिर्लिंगांची याद देण्यात आली आहे. त्यात भीमाशंक
भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….! pic.twitter.com/0hsHvm8sqO
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2023
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच असल्याचे अनेक पुरावे आहेत. हे सांगताना सुप्रिया सुळे यांनी लिहिलंय , श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.अन्य कोणतेही नाही.
सुप्रिया सुळे यांनी सरकारला खोचक सवाल विचारलाय, ‘ घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.. अशा शब्दात त्यांनी बोचरी टीका केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी.