मुंबई : (Maharashtra Politics) राज्याच्या राजकारणात उलथा-पालथ होत असताना जर कोणी थेट मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आसामला येण्याचे आमंत्रण देत असेल सर्वांच्याच भुवया उंचावणार आहेत. पण हे झालंय..अहो खरं आसामचे (Assam CM) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आसाममध्ये या असे आमंत्रण दिलेले आहे. आता यावरुन आणखीन मोठ्या (Political affairs) राजकीय घडामोडी काय घडणार असा सवाल तुम्हाला पडला असेल पण त्यांनी राजकीय घडामोडीसाठी नाही तर आता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी असे म्हणत सध्याच्या राजकीय परस्थितीवर एक प्रकारे खिल्ली उडवली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांनी असे विधान करुन शिवसेनेला डिवचल्याचाच प्रकार केला आहे. मात्र, शिंदे गटाकडे वाढत्या संख्या बळामुळे आता महाविकास आघाडी धोक्यात हे निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांची झालेली अवस्था पाहून त्यांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आसाममध्ये येण्याचे आमंत्रणच त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
आता दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार आता कोणी वाचवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे. पण नव्याने सत्ता केव्हा स्थापन होणार याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगतानाच सध्याच्या राजकीय परस्थितीचा आनंदही होत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे सध्या उद्धव ठाकरेंकडील आमदारांची संख्या ही घटत आहे तर गुवाहटीमध्ये आमदारांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
#WATCH “…He (Maharashtra CM Uddhav Thackeray) should also come to Assam for vacation,” says Assam CM & BJP leader Himanata Biswa Sarma, in Delhi pic.twitter.com/vqtS5F6Jcr
— ANI (@ANI) June 24, 2022
दिवसेंदिवस शिंदे गटाकडील आमदारांची सख्या वाढत ही वाढत आहे. गुवाहटी येथील हॉटेलमध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकावर बैठका पार पडत असून सेत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राज्याच्या राजकारणात उलथा-पालथ होत असताना भाजपाच्या नेत्यांनी मात्र, कमालीचे मौन पाळले आहे. असे असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडीशी भाजपाचा काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. पण या बंडाच्यामागे कोण आहे. याबाबत शरद पवार यांनी भाजपाचे नाव घेतले आहे. यावर पाटलांनी बोचरी टिका केली आहे. पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अतिरेकी वापर करतात, असे ते म्हणाले. शिवाय मी रोज बातम्याही पाहत नाही त्यामुळे राज्याच्या राजकारणाबद्दल फारशी कल्पना नसल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.