मुंबई | 03 डिसेंबर 2023 : आज चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. मतमोजणी केंद्रांवर सकाळपासूनच मतमोजणी सुरु आहे. सुरुवातींच्या कलांनुसार काही राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. अशात जर काँग्रेसला बहुमत मिळालं. महाराष्ट्रातील चार नेत्यांकडे सत्ता स्थापनेची धुरा असणार आहे. काँग्रेसच्या पाच राज्यांची निरीक्षक समिती जाहीर झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे, मुकुल वासनिक यांच्यावर सत्तास्थापन करण्याची जबाबदारी असेल.
देशातील पार राज्यात सध्या निवणूक प्रक्रिया पार पडत आहे. अशात तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये आज मतमोजणी होत आहे. अशात जर या राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रातील चार नेत्यांवर जबाबदारी असेल.
तेलंगणामध्ये केसीआर सरकारच्या विरोधात जनतेच्या मना रोष असल्याचं सध्याच्या कलांवरून दिसत आहे. अँन्टी इन्कंबन्सीचा फटका केसीआर यांना बसताना दिसतो आहे. कारण सुरुवातीच्या दोन कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. अशात इथं जर काँग्रेसला यश मिळालं. तर सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आहे.
मध्यप्रदेशमध्ये जर काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर सरकार स्थापन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांवर असेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यावर सत्तास्थापनेची जबाबदारी असेल.
राजस्थानमध्ये सध्या अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. अशोक गहलोत यांचं सरकार पुन्हा सत्तेत येणार की नाही? याबाबत सध्या संभ्रम आहे. निकालानंतर हे स्पष्ट होईल. मात्र जर गहलोत सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली तर महाराष्ट्रातील नेत्यावर सत्तास्थापनेची जबाबदारी असेल. मुकुल वासनिक यांच्यावर राजस्थानच्या सत्तास्थापनेची जबाबदारी असेल. त्यामुळे आता कोणत्या राज्यात कोण जिंकतं हे पाहणं महत्वाचं आहे.