मुंबई– पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या स्वागतासाठी शिक्रा पाँइंटवर मुख्यमंत्री पोहचल्यानंतर (Cm Uddhav Thackeray) त्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरे यांना उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुरक्षा यंत्रणांवर भडकले. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉलच्या नावाखाली आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी केला. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्रीही आहेत, त्यामुळे ते तिथे उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात सुरक्षा यंत्रणांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बऱ्याचदा मुख्यमंत्री जात नाहीत, अशा वेळी आदित्य ठाकरे राजशिष्ठाचार मंत्री म्हणून स्वागतासाठी जातात. मात्र यावेळी हा प्रकार घडल्याने आता शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल चढवण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना भाषण करण्याची परवानगी न मिळाल्यावरून राजकारण तापलं आहे.
देहू येथील पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली.परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही.हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असा आरोप राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
देहू येथील पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(@Dev_Fadnavis) यांना बोलण्याची संधी दिली.परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार (@AjitPawarSpeaks)यांना बोलू दिले नाही.हा महाराष्ट्राचा अपमान आहे
— Supriya Sule (@supriya_sule) June 14, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.
भाषणे कुणाची व्हावीत आणि कुणाची नाहीत, यापेक्षा आमच्यासाठी वारकर्यांचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. तो होतोय, याचा अधिक आनंद आहे. वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका, ही माझी विनंती आहे. (2/2)@NCPspeaks#Maharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 14, 2022
पंतप्रधान यांनी फक्त अजितदादा यांचा अपमान केला नाही आहे. त्यांनी महाराष्ट्रचा अपमान केला आहे. पदोपदी पंतप्रधान असे करत असतात. त्यांना त्यामध्ये त्यांना आणि भाजपला मजा येते. पदोपदी महाराष्ट्रचा अपमान महाराष्ट्रची जनता सहन करणार नाही. संविधान आहे, प्रोटोकॉल आहे. रीतिरिवाज आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून या गोष्टी आपण फॉलो करत आहे. एखाद्या राज्यात जायचं तिथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान करायचा हे काही जनतेला आवडत नाही. या सगळ्या गोष्टी ते जाणीवपूर्वक करतात. या देशाच वातावरण अतिशय खराब केलं आहे. महागाई वाढली आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.