मुंबई : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी गितेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता राजकारण चांगलंच पेटण्याची शक्यता आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वक्तव्यावरून भाजपाने (BJP) काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं बोलण्याचं धाडस congress गटारगंगेतील नेताच करू शकतो. मुस्लीम मतांसाठी किती शेण खाणार?’ असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
शिवराज पाटील यांनी गितेबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं.जिहाद हा केवळ कुराणातच नाही तर गितेतही सांगितला आहे. महाभारतात श्रीकृष्णानी अर्जुनाला जिहादचा धडा दिल्याचा दावा शिवराज पाटील यांनी केला होता. ते एका पुस्कक प्रकाश सोहळ्यात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचा आता भाजपकडून जोरदार समाचार घेण्यात आला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.’श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं बोलण्याचं धाडस congress गटारगंगेतील नेताच करू शकतो.मुस्लीम मतांसाठी किती शेण खाणार?’ असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे देखील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. शिवराज पाटील चाकूरकर काय बोलले याचा खुलासा त्यांनीच करावा. तसेच शिवराज पाटील यांच्या वस्तव्याशी काँग्रेस सहमत आहे का? शिवराज पाटील चाकूरकर यांनी मांडलेली भूमिका ही काँग्रेसची भूमिका आहे का असा सवालही उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.